नागपूरमधील संचारबंदी उठवली   

नागपूर : नागपूर शहरातील संचारबंदी रविवारी संपूर्णत: मागे घेण्यात आली. दंगलीनंतर काही भागांतील संचारबंदी उठवली होती. काल   उर्वरित चार भागांतील संचारबंदी मागे घेण्यात आली. त्यामुळे नागपूर संचारबंदीमुक्त शहर झाले आहे. 
 
नागपूरमध्ये १७ मार्च रोजी दंगल उसळली होती. त्यानंतर विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली होती. त्यात कोतवाली, गणेशपेठ, तेहशील, लकडगंज, पाचपोली, शांती नगर, सक्करदरा, नंदनवन, इमामबाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर पोलिस ठाण्यांच्या हद्दींचा समावेश होत. 
छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने गेल्या आठवड्यात  सोमवारी रात्री निदर्शने केली होती. तेव्हा पवित्र ओळी लिहिलेली एक चादर जाळल्याची अफवा पसरविण्यात आली होती. त्यामुळे नागपूरच्या मध्यभागांत जमावाने तुफान दगडफेक केली. सर्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याबरोबरच दुचाकी आणि वाहनांची प्रचंड नासधूस केली होती,. सुमारे सहा तासांत दंगल पोलिसांनी अटोक्यात देखील आणली होती. या प्रकरणी १०० पेक्षा अधिक जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 
 
दंगलीत तीन पोलिस आयुक्तांसह ३३ पोलिस कर्मचारी जखमी झाले होते दरम्यान, विश्व हिंदी परिषदेने कोणीतरी चादर पेटवून दिल्याची अफवा पसरविली असल्याचे सांगितले.  यानंतर ११ ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यापैकी नंदनगाव आणि कपिल नगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील संचारबंदी २० मार्च रोजी तर पाचपोली, शांती नगर, लकडगंज, सक्करदरा आणि इमामबाडा येथील संचारबंदी २२ मार्च रोजी उठवली होती. नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी काल  दुपारी ३ वाजता उर्वरित चार भागांतील संचारबंदी उठवत असल्याची घोषणा केली. त्यामध्ये कोतवाली, तेहसील, गणेशपेठ आणि यशोधरा नगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील भागांचा समावेश होता. संवेदनशील भागात गस्त सुरूच राहणार आहे. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूरचा दौरा केला होता. तेथील परिस्थितीचा त्यांनी पोलिस अधिकार्‍यांसमवेत आढावा घेतला होता. सार्वजनिक मालमत्तेची केलेले नुकसान दंगलखोरांकडून वसूल केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दंगलखोरांच्या मालमत्ता जप्त करण्याबरोबरच प्रसंगी मालमत्तांवर बुलडोझर चालविण्याचा इशारा त्यांनी दिला होता. पोलिस अधिकार्‍यांवर हल्ला करणार्‍यांची गय केली जाणार नाही. तसेच दंगलीतील नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे ते म्हणाले होते. 

Related Articles